राज्यभिषेकदिन व स्व. प्रकशादादांच्या स्मृतीप्रीत्यर्थ्य भव्य रक्तदान शिबीर!

139

अजिंक्य जवळेकर

कारंजा येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे युवा संगठन सरकारच्या गृपच्यावतीने शिवसंवराज्यभिषेकदिन व कारंजाचे माजी. आ. स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ जुन रोजी गुरुमंदीर संस्थान सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे. लसीकरण्याच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेला रक्तसाठ्याचा तुटवडा भरुन काढण्यात शहरातील युवकांचे योगदान देऊन आपले सामाजिक दायीत्व जपणे हा या शिबीरामागील मुळ ऊद्देश असल्याचे सरकार गृपचे अध्यक्ष विक्की चौधरी यावेळी म्हणाले.

या रक्तदान शिबीरांस प्रमुख पाहुणे म्हणून आ. प्रकाश दादा डहाके यांचे जेष्ठ पुत्र देवव्रत डहाके, कारंजाचे तहसिलदार धीरज मांजरे, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब लहाणे, रा.स्व.संघाचे जिल्हा सहकार्यवाह विजयजी कदम तसेच नगरसेव प्रसन्ना पळसकर, नितीन गडवाले, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे ई. ऊपस्थित असणार आहे.

सरकार हे कारंजा शहरातील युवकांचे संघटन असून शहारतील सामाजिक कार्यात त्यांच्या नेहमिच सहभाग असतो. शासकीय रुग्णालयांमध्ये फळांचे वाटप, मुकबधिर विद्यालयांत रक्षाबंधन व विविध सण-ऊत्सव साजरे करणे तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय वस्तू पुरवणे, रक्तदान शिबीरे अश्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सरकार गृपच्यावतीने सातत्याने करण्यात येत असते. यंदाचे रक्तदान शिबीराचे सरकार गृपचे दुसरे वर्ष असणार आहे.