गेल्या वर्षी कोरोना विषयक सर्व नियम पाळून सर्वांनी सलून व्यवसाय बंद ठेवला. त्याचे बक्षिस म्हणून की काय यावर्षी सर्वात आधी आमचा व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सलून व्यवसायिकांना दरमहा २० हजार रुपये अनुदान द्यावे, मुलांच्या शाळेची फी, लाईट बिल, घर व दुकानाचे भाडे देवून कर माफ करावे किंवा सलून व्यवसाय बंद करण्याचे आदेश मागे घ्यावेत, असे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली आहे.
शहराध्यक्ष महेश सांगळे, सिंहगड नाभिक विकास मंडळाचे शहराध्यक्ष नीलेश चतुर, नवचैतन्य नाभिक संघाचे अध्यक्ष हनुमंत आढाव, दिनकर कारागीर, नीलेश भोसले यावेळी उपस्थित होते.
तसेच आता देखील लॉकडाऊनच कारण देवून सलून बंद करण्यात येत असेल तर सरकारने एवढ्या दिवस काय केले? असा सवाल महामंडळाने उपस्थित केला आहे.