बारामती- येथे शारदा प्रांगणात सोमवारपासून लसीकरण केंद्र सुरु झाले. कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्याने बारामतीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, आरोग्य विभाग व बारामती नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.एमआयडीसीतील शासकीय महिला रुग्णालयात लसीकरणासाठी लोकांना जावे लागत होते.
शारदा प्रांगण बारामती शहराला मध्यवर्ती असल्याने अनेक लोक येथे येऊन लसीकरण करताना पहिल्याच दिवशी दिसले. शहरातील शारदा प्रांगणात लसीकरण सुरु व्हावे या साठी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी पुढाकार घेतला होता.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या लसीकरण केंद्रास भेट दिली. उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजीत चव्हाण आदींनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.