प्रताप सरनाईकांना ‘ईडी’चा मोठा दिलासा

8

टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती .आता सर्वोच्च न्यायालयाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. 

प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली . चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत. चांदोळे यांच्या अटकेमुळे सरनाईक आणि राहुल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबत माहिती समोर येईल अशी ईडीला आशा आहे. नंदा हे टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आहेत.सरनाईक यांच्या कार्यालयावर काही दिवसांपूर्वी छापेमारीदरम्यान ईडीने परदेशी बँकेचं एक डेबिट कार्ड जप्त केलं होत.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती देताना, ईडीला या छापेमारीत पैशांच्या व्यवहारांच्या काही नोंदी आणि कागदपत्रे आढळून आले आहेत.फ्रिमोन्ट बँकेने प्रताप सरनाईक यांच्या नावे हे डेबिट कार्ड इश्यू केलं . ज्यावर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील फरहाद दाद्रास येथील पत्ता आहे.नोंदी हवाला व्यवहारांच्या असल्याचे दर्शवत आहे. ज्या कंपन्यांबाबतच्या या नोंदी आहेत. त्या प्रताप सरनाईक यांच्याकडून चालवल्या जातात असे म्हटले आहे.