इस्रायलमधील जेरुसलेम, रेहोवोट आणि तेल अविवा येथे इस्रायली आणि भारतीय विद्यार्थ्यांकडून मुंबईवरील (२६/११) दहशतवादी हल्ल्याच्या १२ व्या वर्षपूर्तीनिमित्त मृतांना अभिवादनासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी यामध्ये समील झाले आणि होणार आहेत.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबाबत बोलताना दक्षिण इस्रायलमधील कोस्टल शहर असलेल्या इलाट येथील इसाक सोलोमन म्हणाले, “दहशतवादाला आर्थिक आणि इतर मदत पुरवणाऱ्या प्रत्येक देशाचा इस्रायल विरोध करतो. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी शांतीचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रांनी एकत्र यायला हवं. तसेच एकत्रितपणे राजनैतिकरित्या तसेच आर्थिकरित्या अशा देशांवर बहिष्कार टाकायला हवा.”
भारतासारखा शांतताप्रिय देश आमचा मित्र असल्याचा आम्हा इस्रायली नागरिकांना अभिमान आहे. दोन्ही देशांमधील मैत्री चिरकाल टिकावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असं या कार्यक्रमावेळी एका इस्रायलीनं म्हटलं आहे.