पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं : प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला

37

प्रीतम मुंडे यांनी आज आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले.पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.

बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना आणि पालकमंत्री यांना फक्त माफियांचं हित माहीत आहे,’ असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला होता. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असंही त्या म्हणाल्या. 

बीडमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे.

 रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत.राज्य सरकारने बीडला केवळ 20 डोस दिले आहेत, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला होता.