आपल्या देशात दुसरी लाट अोसरत आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होते आहे. मात्र यासोबतच तिसर्या लाटेचे संभाव्य धोके शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात आले. स्टेट बॅंक अॉफ ईंडीयाने ईकोरॅप नावाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबतचे अंदाज वर्तवले आहे.
करोनाच्या तिसर्या लाटेन जगातील ईतरही देशांना ग्रासले आहे. तिसरी लाट या देशांमध्ये ९८ दिवसांपर्यंत होती. त्यामुळे भारतातसुद्धा ९८ दिवसांपर्यंत ही लाट सक्रीय असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिसर्या लाटेत दुसर्या लाटेपेक्षा १.८ रुग्ण आढळून येतील असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात आला आहे.
कोरोनाकाळात अर्थव्यवस्थेने कशी कामगिरी केली याबाबतसुद्धा या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. जगातील ईतर देशांत आलेल्या तीसर्या लाटेचा अभ्यास करुन हे अंदाज वर्तवण्यात आले आहे. ज्यामध्ये तीसर्या लाटेत भारताला यापेक्षाही अधिक नुकसान होण्याची भिती वर्तवण्यात आली आहे. सोबतच लहान मुलांचा बाधीताचा आकडा या लाटेमध्ये वाढणार असल्याचेसुद्धा सांगण्यात आले अाहे.
परंतू तरिसुद्धा पद्धतशीर नियोजन, आवश्यक त्या सर्व आरोग्यसुविधा, अगोदरच पूर्ण तयारिनिशी या लाटेचा सामना केल्यास आपण यावर मात करण्यास यशस्वी होऊ शकू असा अंदाजसुद्धा या अहवालात वर्तवण्यात आला आहे.