कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवण्यात ‘गुजरात पॅटर्न’ नंबर वन ?

10

गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीची मोठ्या प्रमाणात लपवाछपवी सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता गुजरात सरकारच्या या मृत्यूंच्या आकडेवारीची तफावत समोर आणली आहे.

गुजरातमध्ये १ मार्च २०२१ ते १० मे दरम्यान ७१ दिवसांमध्ये १ लाख २३ हजार मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. तर याच दिवसांत कोरोनामुळे होणारे मृत्यू केवळ ४,२१८ इतके दाखवले गेले आहेत. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं आहे.

इतर मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले जातेय. मात्र गतवर्षीच्या आकडेवारीशी याची तुलना केल्यास गेल्या वर्षी या काळात ५८ हजार मृत्यू प्रमाणपत्रे देण्यात आली होती.

याचा अर्थ यावर्षी ६५ हजार ८०५ अधिक मृत्यू झाल्याचे निष्पन्न होते. नैसर्गिक मृत्यूंमध्ये इतकी वाढ कशी याबाबत गुजरात सरकारकडे काही खुलासा आहे का? अशी विचारणा केली जात आहे.