बॉलीवूड: सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री रेखाचं आज वाढदिवस

33


आपल्या अभिनयानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री रेखा यांचं 67व्या वर्षात पदार्पण झालंय. आज त्यांचा वाढदिवस आहे. रेखाचं वय 66 असलं तरीही सौंदर्याच्या बाबतीत आजही टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकतात. आजही त्यांची बॉलीवूडमध्ये क्रेझ कमी झालेली नाही.

रेखा यांच पुर्ण नाव भानुरेखा गणेशन. यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईत. मद्रासी अभिनेता जेमिनी गणेशन आणि पुष्पावली यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्तातच अभिनय आहे, असं म्हणायला हवं. वयाच्या 12व्या वर्षी रेखा यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाच्या करियरला सुरवात केली. 1966 मध्ये तेलगु ‘रेंगल रत्नम’ चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केला. यानंतर 4 वर्षांनी त्यांनी ‘सावन भादा’ चित्रपटातुन बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली.

रेखा आपल्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेतच. पण त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा केल्याशिवाय कुणी राहणार नाही. सुंदर त्वचा, कोरीव डोळे आणि दाट काळेभोर केस यामुळे अनेकांची मन ताब्यात करणारी ही अभिनेत्री. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगु आणि कानडी भाषेत 180 हुन अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

त्यांचे सिनेमे तर गाजलेच पण त्यांची पर्सनल लाइफही नेहमी चर्चेत असते. रेखाच्या नावासोबत अमिताभ बच्चन यांचं नाव जोडलं जातं. दोघांनीही कधी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली नाही, पण त्यांची चर्चा आजही सुरू आहे. रेखा यांचे दोन विवाह झाले आहेत. पहिला अभिनेता विनोद मेहरा यांच्या सोबत झाला परंतु त्यांच्या आईने रेखा यांना स्वीकारण्यास नकार दिला. त्यांचा दुसरा विवाह उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी झाला होता. परंतु लग्नानंतर काही दिवसात त्यांनी आत्महत्या केली.

1981 मध्ये ‘उमराव जान’ चित्रपटासाठी रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘घर’ या चित्रपटामुळे रेखांच्या अभिनय करियरला कलाटणी मिळाली. रामपुर, काललक्ष्मण, कहाणी किस्मत की, प्राण जाये पर वचन न जाये, धर्मा, नमक हराम, धर्मात्मा, खून पसीना, गंगा की सौगध, मुकदर का सिकंदर, खूबसुरत, अगर तुम ना होते, खून भरी मांग, इजाजत, बिवी होतो ऐसी, भ्रष्टाचार, आस्था, बुलंदी, दिल है तुम्हारा, कोई मिल गया आणि क्रिश यांसारखे अनेक चित्रपट चर्चेत राहिले आहेत.

अभिनेत्री रेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!