परभणी जिल्ह्यातील सेलू येथे लोकसहभागातून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड संचालित बळीराजा मोफत कोव्हिड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णांनी सोमवारी, १० मे रोजी हापूस आंब्याच्या रसाळीच्या भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सेंटरला भेट देऊन आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूस केली. या कोव्हिड सेंटरमध्ये करोना रुग्णांना औषधोपचारासोबतच दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सोमवारी दुपारच्या जेवणात हापूस आंब्याच्या रसाळीचे आयोजन होते.
जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सुद्धा यावेळी जेवणाचा आनंद घेतला यावेळी उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,तहसीलदार बालाजी शेवाळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, मिलिंद सावंत, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, रणजित गजमल, अविनाश शेरे, सर्जेराव लहाने, पांडुरंग कावळे, रामराव गायकवाड, राम मैफळ, गोविंद काष्टे आदींची उपस्थिती होती.
यावेळी गरजू रुग्णांला प्लाझ्मा दान केल्याबद्दल काजळी रोहिणाचे सरपंच भारत इंद्रोके यांचा श्री.मुगळीकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.