हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्यावर दुःखाचा डोंगर हृदयविकाराने झाला वडिलांचा मृत्यू

66

भारतीय संघाचे क्रिकेटपटू कृणाल आणि हार्दिक पांड्या बंधुंवर शनिवारी दुखःचा डोंगर कोसळला आहे. यांचे वडील हिमांशु पांड्या यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त ANIने प्रसिद्ध केलं आहे. कृणाल सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत आहे आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरात परतला. आता तो स्पर्धेत पुढील सामन्यात खेळणार नाही. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.

बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शीशिर हट्टंगडी यांनी सांगितले की, पांड्या कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे आणि त्यामुळे तो स्पर्धा सोडून घरी परतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन पांड्या कुटुंबीयांच्या दुखःत सहभागी आहेत. हार्दिक आणि कृणाल या दोघांनाही क्रिकेटपटू बनवण्यात हिमांषू यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अनेक त्याग करून या दोघांनाही यशस्वी क्रिकेटपटू बनवले.