पं.बंगालमध्ये निवडणुकांचे पडघम वाजले अाहेत. ममता बॅनर्जी यांनी ऊमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर ममता दिदीच्या तृणमुलला धुळीत लोळवण्यासाठी भाजप चांगल्याच तयारीला लागला आहे. अशांतच शिवसेनेने पं.बंगालमध्ये प्रत्यक्ष निवडणुक न लढवता ममता बॅनर्जींना समर्थन देण्याची घोषणा केली. यावर शिवसेनेचे कायमच टीकाकार असणार्या राणे घराण्यातील निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवणारी प्रतिक्रिया दिली आहे.
“जो पक्ष ईतर महाराष्ट्र सोडून ईतर राज्यामध्ये एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही त्यांनी पं.बंगालमध्ये निवडणुक न लढवण्याची घोषणा केली आहे. कारण ममता बॅनरजी तिथल्या वाघीण आहे म्हणे, महाराष्ट्र सोडून ईतर राज्यात आमदार तर सोडाच पण शिवसेनेचा एक नगरसेवकसुद्धा कधी निवडून आलेला नाही. पण ते आता सांगणार कसे.” अशा खोचक भाषेत निलेश राणेंनी शिवसेनेच्या पं.बंगालमधील निवडणुक न लढवण्याच्या घोषणेवर टीकास्त्र सोडले आहे.
बिहारमध्ये शिवसेनेने निवडणुकांत भाग घेतला होता. त्याचवेळी पं.बंगालमध्येसुद्धा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली होती. परंतू आता बंगालमधील वातावरण बघता निवडणुकांत प्रत्यक्ष सहभाग न घेता मनता दीदींना समर्थन देणेच ऊचित ठरणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनीच केली होती. यावेळी पक्षप्रमुखांशी चर्चा करुन हा निर्णत घेतला असल्याचे त्यांनी सांगीतले होते.
सध्या भाजपसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाला एकट्या ममता बॅनर्जी भारी पडत आहेत. कारण त्या वाघीण आहे. आम्हाला विश्वास आहे गेल्या निवडणुकीत ज्याप्रमाणे त्यांनी भाजपला धुळ चारली होती त्याप्रमाणेच यंदासुद्धा त्याच विजयी होणार असेसुद्धा संजय राऊत यावेळी म्हणाले.