शेतकरी आंदोलनाचे परिणाम आता संपूर्ण देशात जाणवायला लागलेय. प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकरी नेत्याकंडून करण्यात आला. यास प्रतिसाद म्हणून अजुन मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सिमांवर दाखल झाले. नविन कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चानंतर देशव्यापी चक्काजाम करणार असल्याची भूमिका शेतकर्यांकडून घेण्यात आली. महाराष्ट्रतदेखील विविध शेतकरी संघटनांच्यावतीने जागोजागी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास महाविकासआघाडीतील तीनही पक्षांनी पाठींबा दिला. यावरुन भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार चांगलेच संतप्त झाले. कॉंग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्याही बुद्धिचा चक्काजाम झाला असल्याची संतप्त टीका त्यांनी केली.
शेतकरी आंदोलनाला आता संपूर्ण देशभरातूनच नव्हे तर जगभरातून पाठींबा मिळतो आहे. देशातील विरोधी पक्षातील नेते शेतकर्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली सिमांवर जात आहेत. शिवसेना नेते संजय राऊतसुद्धा काहि दिवसांअगोदर दिल्ली सिमेवर गेले होते. इतर देशातील सेलीब्रिटींनीसुद्धा ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे.
पॉपस्टार रिहाना आणि ग्रीटा थनबर्ग यांच्या ट्वीटला सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक खेळाडू आणि कलाकारांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आपल्या देशातील आंदोलनाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या या खेळाडू आणि कलाकारांवर शिवसनेनेन प्रश्न ऊपस्थित केले होते. रिहाना, थनबर्गच्या ट्वीटला उत्तर देणाऱ्या सेलिब्रिटींना भाजपनं लक्झरी गाडीत बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरला नेलं पाहिजे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल होतं. शेलार यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करत खेळाडूंचा आणि कलाकारांचा अपमान केला असल्याचे म्हणत शिवसेनेला लक्ष केलं.
“देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेना ‘पॉप डान्स’ करतेय.” असे शेलार यावेळी म्हणाले. सोबतच “वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय?” या अाशयाचे ट्वीट करत शेलार यांनझ असा सवालही उपस्थित केला आहे.