कोरोनाची परिस्थिती आता पुर्ववत झाल्याचे चित्र आहे. प्रतिबंधात्मक लससुद्धा देण्यात येत आहे. मात्र अमरावतीकरांच्या चिंतेत वाढ करणार्या बाबी तीन ते चार दिवसांपासून समोर येत आहे. मागील काही दिवसांत अमरावतीतील कोरोना रुग्णांत अचानक वाढ होते आहे. गेल्या २४ तासांत ३५९ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील पाच महिन्यातील रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुरुवातील सर्विधिक रुग्ण असणार्या महाराष्ट्राने कोरोनाच्या नियंत्रणावर बर्यापैकी यश मिळवले आहे. आता परिस्थितीही सामान्य जाणवत असल्यामुळे बेफीकीरीने जनता वावरत आहे. मात्र अद्यालही कोरोना आपल्यातून गेला नाही याची प्रचिती अमरावतीतील रुग्णवाढीनंतर आली.
अचानक वाढत जाणार्या या रुग्णसंख्येमुळे प्रशासनांतही चिंतेचे वातवरण आहे. सॅनीटायझर, मास्क आणि फीजीकल डिस्टन्स याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. अातापर्यंत जिल्ह्यात २३ हजार ८३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली अाहे. मागील काही दिवसांपासून ही संख्या झपाट्याने वाढते आहे. 3 फेब्रुवारीला 179, 4 फेब्रवारीला 159, 5 फेब्रुवारील 233, 6 फेब्रवारील 199, 7 फेब्रुवारीला 192, 8 फेब्रुवारीला 235, 9 फेब्रुवारीला 183, तर 10 फेब्रुवारीला 359 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.