दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सिमेवर कृषी कायद्यांच्याविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहे. दरम्यान आंदोलकांनी सावधगिरीचा पवित्रा घेत कुठल्याही राजकीय पक्षाला मंचावर जागा दिलेली नाही. मात्र तरिसुद्धा विरोधकांकडून सरकारवर चांगलीच टीका होते आहे. आज या नविन कृषी कायद्यांचा निषेध नोंदवण्यासाठी कॉंग्रसच्या पंजाबमधील दोन खासदारांनी थेट निषेधाचा फलक अंगावर चिटकवत आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एन्ट्री केली. खासदार जसबीर सिंग गील आणि गुरजीत सिंग उजला हे त्या दोन खासदारांचे नाव आहे. एनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.
स्वत:च्या कपड्यांवर शेतकरी समर्थनार्थ फलक चिटकवूनच त्यांनी पूर्ण अधिवेशन केले. दरम्यान या दोनही खासदारांनी ईतराचे लक्ष वेधले होते.
‘मैं किसान हूँ, मैं खेत मजदूर हूँ, मूझ से धोखा मत करो’ तसेच ‘किसान की मौत, काला कानून वापस लो,’ अशी वाक्य या पोस्टर लिहिण्यात आली होती. काळ्या रंगाच्या कपड्यांवर हा मजकूर लिहिण्यात आला होता.