‘ते तर सरकारचे मार्गदर्शक’; शरद पवार सरकारचे रिमोट कंट्रोल नाहीत : उध्दव ठाकरे

2

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. जुलैमध्ये घेतलेली ‘अनलॉक मुलाखत’ प्रचंड गाजली होती. यानंतर या मुलाखतीवर भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुद्धा सोडलं होतं. आता वर्षपूर्तीच्या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीची सध्या चर्चा आहे.

आता, ठाकरे सरकारला वर्षपूर्ती होत आहे. याच वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उध्दव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शरद पवार हे सरकारचे रिमोट कंट्रोल असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावरही उध्दव ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली.

महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटणार आहे. तसेच, शरद पवार हे सरकारचे मार्दर्शक आहेत, रिमोट कंट्रोल नाहीत, असा खुलासाही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत केला आहे.
त्यामुळे आता विरोधकांना शरद पवारांची सरकारमध्ये भूमिका काय याचं उत्तर मिळालं आहे.