त्यानंतर ते पोलिस चौकशीसाठी बाहेर गेले आणि परत आलेच नाही: मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

47

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात असतानाच स्फोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला आहे. 

मनसुक यांना गुरूवारी रात्री कांदिवलीवरून एका तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर ते पोलिस चौकशीसाठी बाहेर गेले आणि परत आलेच नाही.  असा खुलासा मनसुक हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे .

कांदवली क्राईम ब्रांचमध्ये तावडे आडनावाचे कोणीही अधिकारी कार्यरत नाही. मात्र दहिसर क्राईम ब्रांचला युनिट 12 महेश तावडे नावाचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचं आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी दिली आहे.

क्राईम ब्रांचचे अधिकारी महेश तावडे 1 मार्चपासून सुट्टीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात टीव्ही 9 मराठीने वृत्त दिल आहे .