आयपीएलमध्ये चेन्नई सोबत हे खेळाडू नसणार; हरभजनसह ‘या’ दिग्गज खेळाडूंना चेन्नईने सोडलं

21


आयपीएलच्या १३व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जला टॉप-४ देखील गाठण्यात अपयश आलं होतं तर, मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवत आयपीएलवर आपलं नाव कोरले होते. कोरोनामुळे १३ वे हंगाम युएईमधील देशांमध्ये घेण्यात आला होता. लवकरच १४व्या हंगामाची सुरुवात होणार आहे.

चेन्नईने संघाने काही खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांची नावं त्यांनी ट्विटरवर जाहीर केले आहेत. यावर्षीच्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जने दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगला वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यंदा आयपीएलचं १४ वे सत्र आहे  चेन्नई सुपर किंग्ज महेंद्रसिंह धोनीच्याच नेतृत्वात खेळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर केदार जाधव, शेन वॉट्सन, हरभजन सिंग, मुरली विजय, मोनू सिंग यासह आयपीएल २०२० मध्ये आपल्या फिरकीच्या शैलीने खास ठसा उमटवून चर्चेत राहिलेल्या पियुष चावलाला देखील संघाने सोडले आहे. त्यामुळे आता चेन्नईची नेमकी रणनीती काय असणार ते आपल्याला येणाऱ्या काळात कळेल.