“आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का ? लसीकरण मुद्द्यावरून गोपीचंद पडळकरांची टीका !

59


सध्या १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे अपुऱ्या लसीच्या साठयामुळे लसीकरण सुरु करता येणार नाही या लसीकरणाला थोडा वेळ लागेल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. यावरून विरोधकांनी आघाडी सरकारला धारेवर धरले होते. तसेच आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली आहे.


“काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की एक तारखेपासून आम्ही १८ ते वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार आहोत. नंतर ४ वाजता सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली होती का,” असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्य सरकारला केला आहे.


येत्या 1 मेपासून राज्यभरात कोरोना प्रतिंबधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येईल, असे राज्य सरकारने यापूर्वी सांगितले होते. मात्र, काल आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना १ मे पासून पुरेशा लसींअभावी लसीकरणाची मोहीम राबवता येणार नाही असे त्यांनी संगितले होते. हाच मुद्दा घेऊन पडळकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. आता या टीकेला रास्त्रवडी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.