मराठा आरक्षणावर आजपासून सुनावणीस सुरुवात

17

मराठा आरक्षणावर सरकारने संपूर्ण तयारीनीशी न्यायालयीन लढाई लढावी. आम्ही तयारी केली आहे, असं मराठा मोर्चाचे समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणावरील नियमित सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती, मात्र या प्रकरणावरील सुनावणी आजच म्हणजे 20 जानेवारी रोजी लिस्ट झाल्याची माहिती मिळाली आहे.

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी ही 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. याआधी 11 तारखेला मराठा आरक्षणावर बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारची आणि वकिलांची दिल्लीत बैठक झाली होती.