कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचं हेमा मालिनी यांचा दावा

12

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 6 हजारांनी घट झाली आहे.

त्यातच ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी अजब दावा केला आहे. कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवन करण्यात आलं. यावेळी हेमा मालिनी यांनी कोरोनातून बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचं म्हटलं आहे.

तसेच धूपयुक्त हवनमुळे घरातील वातावरण शुद्ध होतं. मी रोज हवन करते, तुम्हीही करा, असा सल्ला हेमा मालिनी यांनी सर्वांना दिला आहे.