एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राची पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहता का? असा प्रश्न विजय दर्डा यांनी शरद पवार यांना विचारला होता. यावर तिचा रस राज्याच्या राजकारणात नसून देशाच्या राजकारणात अधिक आहे. असे उत्तर वडील शरद पवार यांनी दिल आहे.
तसेच शरद पवार यांच्यानंतर आत्ता राष्ट्रवादीची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे सोपवली पाहिजेत. अशी अनेकदा चर्चा होते. याबद्दल विचारले असता तरुणांचा मोठा संच आहे. यामध्ये मान्य असलेले अनेक लोक असू शकतात. अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील असे अनेक लोक आज या पक्षात कुवतीचे आहेत. असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीची सूत्र कोणाकडे जाणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदी बसवावे असे वक्तव्य केले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांना सर्वउत्तम संसदपटूचे पुरस्कार ही मिळाले आहेत. तिची आवड देशाच्या राजकारणात आहे. असे उत्तर शरद पवार यांनी दिले आहे. यानंतर आत्ता सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.