औरंगाबाद मधील जालना रोडवर अमरप्रीत चौकात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्पाचे अनावरण उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेते मा.खा.चंद्रकांतजी खैरे, आमदार प्रदीपजी जैस्वाल, आमदार संजयजी शिरसाठ, आमदार अंबादासजी दानवे, आमदार सतीश चव्हाण, मनपा आयुक्त श्री.आस्तिक कुमार पाण्डेय आदींसह महाविकास आघाडीच्या पदाधिकऱ्यांची उपस्थिती होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संभाजीनगरवर विशेष प्रेम होते. मुंबईनंतर शिवसेना रुजली, वाढली ती म्हणजे औरंगाबाद मध्ये, म्हणून शिवसेना आणि औरंगाबाद हे एक वेगळं समीकरण आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे काल विविध कामाचं उद्घाटन, भूमिपूजन शिवसेना नेते सुभाष देसाई, आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहरात पार पडले.