कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाची स्थगिती

7

गोरेगावमधील आरे मेट्रो कारशेड उभारण्याच्या निर्णयावर स्थगिती आली आहे. मेट्रो करशेडला कांजूरमार्ग येथील जमीन दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचे काम रखडले आहे.

हिवाळी अधिवेशनातही कांजूर मार्ग येथील कारशेडवर चांगलाच गोंधळ झाला आहे. आज कांजूर मार्ग येथील कारशेडवरुन उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. परंतू या जागेवर केंद्राने आपला मालकी हक्क सांगत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सध्या केंद्र सरकारच्या याचिकेवर नियमित सुनावणी सुरु आहे.

मेट्रो लाईन ३ प्रमाणेच मेट्रो लाईन ६, ४ आणि १४ साठी ही जागा अत्यंत मोक्याची आहे. जवळपास ५५०० कोटी रुपयांची सरकारची बचत होईल आणि १ कोटी नागरिकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण ठरेल. कांजूरमार्ग येथील जमीन मेट्रो ६, ४, १४ आणि मेट्रो ३ च्या मार्गांसाठी उपयोगी होईल. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज कांजूर मार्ग येथील मेट्रो कारशेडवरून उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. हे आदेश देतानाच कोर्टाने येत्या फेब्रुवारीत या प्रकरणावर अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोर्टाचा आजचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिल्याने सोमय्या यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.