देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील मेट्रोमधून प्रवास करतानाचे फोटो ट्विट केले आहेत.त्यावरून विधानसभेचे विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा प्रश्न आहे,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही, असे फडणवीसांनी ट्विट केले होते.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. हे सर्व काम आम्ही तडीस नेत आहोत. मेट्रोच्या कामासाठी राज्याच्या हिश्शाचा पूर्ण निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.असेही पवार बोलताना म्हणाले.
या ट्विटरमध्ये ‘मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन?,’ असा सवाल करत महाविकास आघाडीला चिमटा काढला होता. फडणवीसांच्या याच ट्विटला उत्तर देताना अजित पवार यांनी वरील वक्तव्य केले.