राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर पदाचा राजिनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आतुक्त परमबीर सींग यांनी अनिल देशमुखांनी १०० कोटी वसुल करण्याचे टार्गेट सचिन वाझेला दिले होते असा आरोप केला होता. यानंतर गृहमंत्री वादाच्या भोवर्यात अडकले होते. मुंबई ऊच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीअाय चौकशीचे आदेश देताच अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजिनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.
अॅड. जयश्री पाटील यांनी याप्रकरणी मुंबई ऊच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज ५ एप्रील रोजी सुनावनी होती. सुनावणीदरम्यान या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येण्याचे आदेश ऊच्चा न्यायालयाने दिले.
“मुंबई ऊच्च न्यायालयाने पारीत केलेल्या प्राथमिक चौकशीच्या आदेशानंतर मी गृहमंत्री पदावर राहणे नैतीकदृष्ट्या योग्य वाटत नाही, तरि मला कार्यमुक्त करावे ही नम्र विनंती.” असे अनिल देशमुख यांनी आपल्या राजिनाम्यात नमुद केले आहे. अगोदर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट त्यांनी घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजिनामा सुपुर्द केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजिनाम्याची तीव्र मागणी करण्यात येत होती. अनिल देशमुख यांच्या राजिनाम्यावरुन महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये मतभेदसुद्ध होते. मात्र अखेर अनिल देशमुख यांनी आपला राजिनामा दिला आहे. आता पुढील चौकशीत काय निष्पन्न होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.