गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक, सायबर सेलकडे तक्रार

7

गृहराज्यमंत्री, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाले आहे. अचानक ट्वीटर अकाउंट लॉक झाले असून सर्व ट्वीट्स डिलीट झाले आहे. सतेज पाटील फॉलो करत असलेल्या अकाऊंट्सची संख्याही शून्य दिसत आहे. हा प्रकार लक्षात येताच सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे. सतेज पाटील यांचे सर्व ट्विट देखील डिलीट झाले आहेत.

आज सकाळी सतेज पाटील यांच्या ट्विट अकाउंटवरून अचानक ट्विट दिसत नव्हते, तसेच त्यांचे ट्विटवर अकाउंट आणि नावही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांना ट्विटर हॅक झाल्याचा संशय निर्माण झाला. परंतु ट्विटर हॅक झाले असते तर त्यावरून चुकीचे मॅसेज ट्विट झाले असते, पण असा कोणताही प्रकार अजून घडलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. नेमके कशामुळे अचानक ट्वीटर अकाऊंट लॉक झाले. टीव्टर खाते पाहणारे माझी सहकारी टीम यांनी टीव्टर खात्यात टेक्निकल सेटिंग चेंज काहीच केले नाही. तरी कसे काय अचानक सर्व बंद पडले याची चौकशी आता केली जाईल, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.