गेल्या दहा दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरत असणारे पुजा चव्हान आत्महत्या प्रकरण दिवसागणिक वेगळी वळणे घेत आहे. या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्याचे नाव पुढे येत असल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. आता यादरम्यानच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
पुजा चव्हान हीने वनमंत्री तसेच शिवसेनेचे दिग्रस मतदारसंघाचे आ. संजय राठोड यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंद्धातून आत्महत्या केली, असा अारोप होतो अाहे. याकरिता देण्यात येणारा पुरावा म्हणजे पुजाच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या अॉडिअो क्लीप या क्लीपमधील आवाज कुणाचा आहे याचा तपास सुरु आहे. संजय राठोड यांचा राजिनामा घेऊन त्यानंतर चौकशी करण्याची मागणी भाजपकडून होते आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार आहे. चौकशीअंती राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेईल. असे अनिल देशमुख म्हणाले.
पुजा चव्हान आत्महत्याप्रकरणी महाविकासआघाडी सरकारवर विरोधकांकडून आरोप होत असले तरीसुद्धा पुजाच्या आई-वडिलांनी अद्याप कुठलिही तक्रार दाखल केलेली नाही. “आम्हाला कुणावरही संशय नाही, कुणाविरोधात आमची तक्रारही नाही. अगोदरच आमची खुप बदनामी झाली आहे. अजून बदनामी करु नका” अशी प्रतिक्रिया पुजाचे वडिल लहू चव्हान यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.
याप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे आरोप भाजपकडून होते आहे. मात्र या आरोपांमध्ये कुठलिही तथ्यता नाही. पोलिस आपला तपास करते आहे. असेसुद्धा अनिल देशमुख यावेळी म्हणाले.