घरात कोरोनाबाधीत रुग्ण असतांना सार्वजनीक कार्यक्रमात सहभागी होणे कितपत योग्य, ऊद्धव ठाकरेंवर का होतेय टीका

9

नुकताच हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्माकरकाचा भूमिपुजन सोहळा महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या ऊपस्थितीत पार पडला. यावरुनच आता शिवसेनाप्रमुख ऊद्धव ठकारे यांच्यावर टीका होते आहे. घरात दोन कोरोनबाधीत रुग्ण असतांना ऊद्धव ठाकरे सार्वजनीक कार्यक्रमात कसे काय सहभागी होतात? असा सवाल भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मुंबईत वेगाने कोरोना रुग्णांची वाढ होते आहे. अशांतच मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी मुंबईकरांना नियमांचे पालन न केल्यास कडक निर्बंध लावण्याचा ईशारा दिला आहे. परंतू घरात दोन-दोन कोरोनाबाधीत रुग्ण असतांना ऊद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपुजन सोहळ्यात सहभागी होतात. यावर किशोरी पेंडणेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. असे भातखळकर म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपुजनास उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व ईतरही नेते ऊपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी भाजपच्या कुठल्याही नेत्यास आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळेदेखील भाजपकडून शिवसेनेवर टीका होते आहे.

परंतू अतुल भातखळकर यांनी थेट निशाना लावत नियम आणि निर्बंध सामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न निर्माण केला आहे.