सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात भाजप व मविआ यांच्यात चांगलाच वाद निर्माण आहे. सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा चांगलाचं समाचार घेतला आहे. यावरून आता पडळकरांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी राऊतांना एक पत्र लिहले आहे. या पत्रातअसून राउतांचा पाणउतारा केला आहे. या पत्रात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती?असा प्रश्न विचारत पडळकर यांनी टिका केली आहे.
पडळकर यांनी ट्विट केले आहे की,’सामना मी कधी वाचत नाही सोशल मीडियामधून मला लेख वाचायला मिळाला आहे. सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझ्यावर टीका केली. त्यांच्या विकृत लिखाणाला उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत अनेक जाणकार मंडळी महाराष्ट्रभर काम करत आहेत. त्याचसाठी हा पत्र प्रपंच’ असं म्हणत त्यांनी पत्रकातून पडळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.
या पत्रात गोपीचंद पडळकर यांनी लिहले आहे, मी आपणांस खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्वोधन देऊन लिहू शकलो असतो, आपल्या दैनिकात माझा उल्लेख फेकूचंद केला यापद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही, प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे असं त्यांनी सांगितले.
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. सामना वृत्तपत्र आपण वाचत नाही. आता सामना व्यापारी झालेला आहे. अशा खोचक टिका पडळकरांनी राऊतांवर केल्या आहेत.