विधानसभा निवडणूक असलेल्या पाच राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी कशी

51

देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र त्याचवेळी विधानसभा निवडणूक असलेल्या पाच राज्यात रुग्णसंख्या कमी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महाराष्ट्रात करोना चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे रुग्णसंख्या अधिक असल्याचं बोललं जात आहे. मात्र यामुळं राज्यात लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

काँग्रेसनेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी थेट कोविड टास्क फोर्सलाच या संदर्भात प्रश्न विचारला आहे.विधानसभा निवडणूक असलेल्या पाच राज्यात करोना रुग्णसंख्या कमी आहे. अनेक केंद्रीयमंत्री मोठमोठ्या प्रचारसभा घेत आहेत.