जळगाव येथील आशादिप महिला वसतिगृहातील एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. काही पोलिस कर्मचारी आणि पुरुषांनी वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचण्यास भाग पाडल्याची तक्रार एका महिलेकडून प्राप्त झाली होती. यानंतर या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद ऊमटले. विरोधी पक्षांनीसुद्धा अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत महिलांच्या सुरक्षिततेवरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. परंतू या प्रकरणांत काहीही तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीांती सभागृहात स्पष्ट केले. त्यानंतर मात्र एकनाथ खडसे यांनी विरोधातील भाजपला सुनावले आहे.
संपूर्ण माहिती न घेताच विरोधी पक्षातील नेत्यांनी बोलण्याची घाई केली. संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे जळगावचे नाव बदनाम झाले आहे. विरोधकांचा हा प्रकार म्हणजे ऊठावडेपणाचे लक्षण आहे. असे ते म्हणाले. तसेच कुठलिही परिपूर्ण माहिती न घेता बोलणे हे जवाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नव्हे असेसुद्धा ते यावेळी म्हणाले.
जळगाव येथील गणेश कॉलनीतील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सहा वरिष्ठ महिला अधिकार्यांची समिती नेमुन चौकशीचे आदेश दिले. संबंद्धित तक्रारदार महिला वेडसर आहे. तिच्याविरुद्ध याअगोदरसुद्धा पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. अशी खळबळजन माहिती समोर आली. तसेच घटना घडलेल्या दिवशी महिलांच्यावतीनेच त्याठिकाणी मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्हायरल व्हिडिअोतील भाग हा त्यातीलच आहे. मात्र त्यावेळी त्याठिकाणी कुठलाही पुरुष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.
जळगावमधील हे वसतिगृह महिला व बालविकास विभागामार्फत चालवले जाते. या वसतिगृहात पिडित आणि घटस्फोटीत महिला राहतात. तक्रारदार महिलेची माहीती आपल्या समोर आली आहे. मात्र आता या वसतिगृहातील महिलांची आणखी बदनामी केली जाऊ नये असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर म्हणाल्या आहेत.