मुंबईत प्रशासनाची मी बेजवाबदार मोहीम! विनामास्क फिरणार्‍यांवर मुंबईत सर्वाधीक कारवाई

9

कोरोनाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पुन्हा आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी रुग्णसंख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. यंदाही महाराष्ट्राने तो मान कायम ठेवला आहे. त्यामध्ये मुंबईत पुन्हा संसर्ग फैलण्यास सुरुवात झाली आहे. तरिदेखील मुंबई कर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यायला तयार नाहीत. दरम्यान विनामास्क आणि कोरोनाच्या नियमांचे ऊल्लघन करणार्‍यांवर सर्वाधीक कारवाई मुंबईत झाली आहे. नुकतेच मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईचे आकडे प्रसिद्ध केले आहेत.

एप्रील २०२० ते २१ मार्च २०२१ पर्यंत तब्बल २० लाख लोकांवर प्रशानाने कोरोना नियनांचे ऊल्लघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. सार्वजनीक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत ४० कोटी रुपयांचा महसुल मुंबई महापालिकेने या दंडात्मक कारवाईतून मिळवला आहे.

महाराष्ट्र सरकारतर्फे मी जवाबदार मोहीम राबवली जात आहे. ज्यामध्ये कोरोना नियमांचे पालन करण्यासंर्भात जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना नियमांचे ऊल्लंघन केल्यास कोरोना वाढण्यास मीच जवाबदार असा अर्थ त्याचा होतो. मात्र मुंबईमध्ये याऊलट मी बेजवाबदार मोहीम राबवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

मुंबईत दिवसाला २ ते ३ हजार रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमिवर नियमांचे काटेकोर पालन करावे असे महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरिदेखील मुंबईकर सर्व नियम-निर्बंधांना वेशीवर टांगुन मुक्त वावर करीत आहे. गर्दीच्याठिकाणी जमाव करत आहे. फजीकल डिस्टन्सचे अक्षरश: वाभाडे काढले जात आहेत.