बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला मेहबुब इब्राहिम शेख आपण नाही, असा दावा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी केला आहे. फिर्याद दिलेल्या महिलेने 14 नोव्हेंबर 2020 रोजी शहरातील रामगिरी हॉटेलनजिकच्या एका महाविद्यालयाजवळील निर्मनुष्य जागेवर कारमध्ये आपल्यावर मेहबुब इब्राहिम याने कारमध्ये आपल्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरुन सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या मेहबुब शेख यांनी गावात या नावाचा माझ्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती नाही. मग जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, तो मेहबुब शेख कोण? असा सवाल पोलिसांनाच विचारला आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन यामागील खरा सूत्रधार पोलिसांनी शोधावा, असंही शेख यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांचं खंडन केलंय.यावेळी आपली बाजू मांडताना मेहबूब शेख यांना भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडू आलं. त्यांनी आपण निर्दोष असल्याचं सांगतानाच खरं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपली नार्को टेस्ट करण्याचीही तयारी दर्शवली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे हेही उपस्थित होते