“र‍ाज्यपालांचा मी आवडता मंत्री” महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्याचे वक्तव्य

11

राज्यलाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विमानप्रवासावरुन महाराष्ट्रात महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा वाद सुरु आहे. यादरम्यान महाविकासअघाडीतील मंत्री उदय सामंत यांनी “मी राज्यपालांचा आवडता मंत्री आहे” असे वक्तव्य केले आहे. सोलापुर येथे पत्रकारांशी ते संवाद साधत होते. उदय सामंत याच्या या वक्तव्याचे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरिदेखील त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात कायम खटके ऊडाले असल्याचे महाराष्ट्राने बघितले आहे. राज्यपाल हे संघ विचारांचे आहे. त्यामुळे ते भाजपांस झुकते माप देतात आणि महाविकासआघाडी सरकारवर अन्याय करतात असा आरोप राज्य सरकारमधील नेत्यांकडून वारंवार होत असतो. आता विमानप्रवासावरुन नविन वाद निर्माण झाला आहे. यावरु भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून राज्य सरकारकडून स्पष्टीकरणे देण्यात येत आहे.

यावरच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना पत्रकारांनी राज्यपालांशी त्यांच्या संबंद्धांबद्दल विचारणा केली. यावेळी “मी राज्यपालांचा लाडका मंत्री आहे. त्यामुळे मला काहीही अडचण येत नाही. ज्या काही राजकीय गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या आहेत. शिक्षण खाते चालवत असताना राज्यपालांशी संबंध येत असतो. माझा वर्षभराचा कार्यकाळ पहिला तर लक्षात येईल माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत” असे उदय सामंत म्हणाले.

राज्यपालांना देहरादुन येथे खाजगी कामासाठी जायचे होते. तेव्हा खाजगी कामासाठी सरकारच्या विमानाने प्रवास करायचा असल्यास रीतसर परवानगी घ्यावी लागते. राज्यपालांना मात्र ही परवानगी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांना सरकारी विमानातून प्रवास करण्याऐवजी खाजगी विमानातून प्रवास करावा लागला होता. यावरुन राज्यात चांगलेच राजकारण तापले होते.