“देशवासीयांना मी आश्वासन देतो की ….” छत्तीसगढमधील नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शहांनी नक्षलवाद्यांना दिला हा ईशारा

24

छत्तीसगढमधील जंगलात नक्षलवादी अाणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले आहे. एकाचवेळी २२ जवानांना हौतात्म्य आल्यामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अलिकडच्या काळात हे नक्षलवाद्यांचे सर्वात मोठे हत्याकांड असल्याचे मानले जाते आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

अमित शहा यांनी जवानांना श्रद्धांजली अर्पन करीत हा लढा यापेक्षाही जास्त ताकदीने लढू आणि यामध्ये आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. छत्तीसगढमधील बीजापुर आणि सुकमा जिल्ह्यातील सिमाभागात हा हल्ला झाला आहे. अमित शहा यांनी या भागाची पाहणी केली असून मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासोबत आढावा बैठकसुद्धा घेतली आहे.

संपूर्न देशाच्यावतीने मी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पन करतो. शहीद जवानांचे शौर्य आणि हौतात्म्य देशाच्या कायम स्मरणात असेन. नक्षलवाद्यांविरोधातला लढा हा निर्णायक टप्प्यावर आला आहे. परंतू या हल्ल्यामुळे आता तो अधिक तीव्र होणार आहे. मी संपूर्ण देशवासियांना आश्वासन देतो की भविष्यात हा लढा अधिक तीव्र होणार असून यामध्ये विजय आपलाच होणार आहे. असे अमित शहा म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादविरोधी चळवळ राबवली जात आहे. यादरम्यान अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान प्राप्त झाले आहे. अनेक अंतर्गत भागात जवानांनी ताबा मिळवून त्याठिकाणी छावण्या ऊभारल्या आहे. याचा संताप म्हणूनच नियोजनपूर्वक हा हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये मोठ्यसंख्येने नक्षलवादीसुद्धा ठार झाले आहेत.