दानशूर व्यक्तींकडून मी भीक मागून पैसे गोळा करून देतो़ पण महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होऊ देणार नाही : चंद्रकांत पाटील

4

एस.एन.डी.टी़ महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राचे (कोविड केअर सेंटर) लोकार्पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़

अ‍ॅडव्हॉन्सशिवाय रेमडेसिविर मिळत नसल्याचा दावा राज्य सरकार करीत असल्यास, पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असेही सांगितले असल्याचे पाटील म्हणाले़

समाजातील दानशूर व्यक्तींकडून मी भीक मागून पैसे गोळा करून देतो़ पण महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही आणि रुग्णांवर योग्य वेळी उपचार होऊन ते बरे होतील याची काळजी घ्या, असे प्रतिपादन पाटील यांनी केले आहे़.