संभाजी महाराज वेगळा पक्ष काढणार का याबाबत मला माहिती नाही : छगन भुजबळ

15

छगन भुजबळ यांच्या अनपेक्षित वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया काहीशा उंचावल्या आहेत.ते सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष काढला तर त्यामध्ये ते मला घेणार आहेत, या वृत्ताबद्दल मला काहीही माहिती नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले.

त्यावर भुजबळ यांनी म्हटले की, संभाजी महाराज वेगळा पक्ष काढणार का याबाबत मला माहिती नाही.तसेच संभाजीराजेंनी वेगळा पक्ष काढलाच तर ते मला त्या पक्षात घेणार आहेत याबाबत मलातरी माहिती नाही, अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली.

शासकीय कार्यालयचे ही 25 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांना होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.