राज्यात भाजपला मागे सारून महाविकास आघाडी सरकार येणार अस भाकीत मी केलं होतं: काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने केला गौप्यस्फोट

7

केंद्रातील सरकार, भाजप आणि संघ परिवारातील संघटना शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे पूर्णत तोंडघशी पडले आहे. आंदोलनात फूट पाडण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न पूर्णतः निष्फळ ठरले आहेत. राज्यात भाजपला बाजूला करून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी होणार असे पहिले भाकित मी केले होते असा गौप्यस्फोट माजी खासदार काँग्रेसचे प्रवक्ते हुसैन दलवाई यांनी आज चिपळूणला केला.

मुस्लीम समाजाने शिवसेनेबरोबर यावे यासाठी मी मुस्लीम समाजातील नेत्यांचे प्रबोधन केले होते. त्यावेळी देशभरातून माझे कौतूक आणि अभिनंदन झाल्याचे दलवाई यांनी सांगितले.दलवाई दोन दिवस चिपळूणच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्यानंतर भाजप मित्र पक्षाला बरोबर घेवून सत्तेत येणार अशा प्रकारच्या वावड्या उठल्या होत्या. त्यावेळी मी इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून म्हणालो होतो की भाजप सत्तेत येणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यात सरकार येणार.

शिवसेनेबरोबर सत्तेत बसण्यासाठी मी काँग्रेस हायकमांडबरोबर चर्चा केली होती. सत्ता स्थापन करण्याच्या काळात रात्री पहाटे जे नाट्य घडत होते त्यावर माझे बारकाईने लक्ष होते.असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.