मी दाबावामध्ये मुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला आहे:नितीश कुमार

12

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान नितीश कुमार यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचेही नमूद केलं होतं. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्यावरुन बरीच चर्चा रंगली होती.बिहारच्या मुख्यमंत्री पदाची तब्बल सातव्यांदा शपथ घेतलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, असं खुद्द नितीश कुमार यांनी काल सांगितलं. 

यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती. मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला आहे.यंदाच्या त्यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसने थेट त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश यांच्या या वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाही” अशा शब्दांमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यावरील निर्णयाबद्दल बोलताना म्हटलं आहे.त्यांना(नितीश कुमार) मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. भाजपा आणि जदयूच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्या नावावर व दूरदृष्टीवर निवडणूक लढवली आणि जनतेने तुमच्यासाठी मतदान केलं आहे. अखेर जदयू, भाजपा व विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला.” असं सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं आहे.