एकीकडे कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत असतांना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसींवरुन राजकारण होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान राज्याचे माजी आरोग्य महासंचालक आणि राज्याचे प्रमुख कोरोना सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी जेंद्रिय आरोग्यनंत्री डॉ. हर्षवर्धनच्या त्या टीकेस दुर्दैवी संबोधले आहे.
डॉ. हर्षवर्धन यांना मी १९९५ पासून अोळखतो. पोलिअो निर्मुलनासाठी त्यांनी ऊत्तम कार्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेतसुद्धा त्यांनी माझ्याबरोबर काम केले आहे. देशातील आरोग्यव्यवस्थेची त्यांना पुर्ण जाण आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचे वक्तव्य म्हणजे राजकीय हेतून प्रेरीत होऊन ते बोलत होते हे मी जवाबदारीने सांगू शकतो.
डॉ. सुभाष साळुंखे यांनी यावेळी महाराष्ट्राच्या आरोग्यव्यवस्थेचे तसेच कोरोनावरील नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांचे कौतुकसुद्धा केले आहे. महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू वगळता ईतर राज्यांमध्ये कोरोनावरील काम पाहिजे तीतके प्रभावी नसल्याचेसुद्धा त्यांनी म्हटले आहे.
केंद्रिय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रावर केलेली टीका ही निव्वळ राजकीय हेतूने केली गेली आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक असल्यामुळे काहींना आनंद होतो आहे. मात्र ऊद्या निवडणुक होणार्या पाच राज्यांमध्येसुद्धा कोरोनाचा ऊद्रेक होणार तेव्हा कुणास जवाबदार धरले जाणार असेसुद्धा साळु्खे यावेळी म्हणाले.