भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतानाच त्यांना खोचक सल्ला देखील दिला आहे.
तसेच चक्रीवादळाचा परिणाम म्हणून किनारी भागात वादळी पाऊस झाल्यामुळे रस्ते आणि विजेचे खांब उखडल्याचं पाहायला मिळालं. कोकणातल्या या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना केलेल्या कोकण दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
उद्धवजींशी माझं काही वाकडं नाही. ते काही माझे दुश्मन नाहीत. पण प्रशासन हे काठी घेऊन बसल्याशिवाय ताळ्यावर येत नाही. शरद पवार राजकीयदृष्ट्या आमचे कितीही विरोधक असोत. पण लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवार लातूरमध्ये तंबू ठोकून राहिले. त्यामुळे तिथली परिस्थिती नियंत्रणात आली. असेही ते बोलताना म्हणाले आहेत.
एवढ्या मोठ्या संकटात ८ दिवस राहणं कठीण आहे. आता वादळ आल्यानंतर तिथली हवा बरी आहे. तुम्हाला प्रकृतीच्या समस्या आहेत तर तंबूत नका राहू. पण प्रशासनात भिती निर्माण व्हायला हवी, बघा मुख्यमंत्री बसले आहेत!”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.