“भाजपमधील अस्वस्थता मला माहितीये” एकनाथ खडचेंसा मोठा दावा

6

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाना साधला असून, मला भाजपमधील अस्वस्थता माहितीये असे खडसे म्हणाले. भाजपमध्ये बहुतांश काळ घालवलेल्या एकनाथ खडसेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. दरम्यान भाजपच्या नेत्यांच्या सरकार पाडतो या वाक्याची त्यांनी खिल्ली ऊडवली आहे.

सध्या भाजपमध्ये असणार्‍या आमदारांना मीच पक्षात प्रवेश दिला आहे. अनेकांना मीच तिकीट मिळवून दिले आहे. त्यामुळे ते माझ्याशी मोकळेपणाने बोलत असतात. पक्षाच्या नेत्यांवर नाराजि व्यक्त करीत असतात. आमदारांच्या मनातली ही नाराजी वाढू नये म्हणूनच सरकार पाडण्याची वक्तव्ये भाजपकडून केली जातात. असे एकनाथ खडसे म्हणाले.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. यापूर्विसुद्धा चंद्रकांत पाटलांकडून सरकार पाडण्याची तारीख देण्यात आली होती. फडणवीसांनी तर निश्चितसुद्धा केली होती. मात्र आतापर्यंत काहीही झालेले नसून ऊलटपक्षी सरकार मजबुत होते आहे. विरोधकांना सध्यातरी सरकार पडण्याची बरीच वाट पाहावी लागणार आहे. असेसुद्धा नाथाभाऊ म्हणाले.

दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या जळगाव दौर्‍यादरम्यानच्या खडसेंच्या घरी दिलेल्या भेटीवरसुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी विरोधी पक्षनेता असतांना देवेंद्र फडणवीस १८ ते २० तास माझ्याच घरी पडून राहायचे. माझ्याच घरी जेवायचे. त्यामुळे त्यांनी काही पहिल्यांदा माझ्या घरी भेट दिली आहे असे नाही. असे नाथाभाऊ यावेळी म्हणाले.