एका मुलाखतीमध्ये अमृता यांना प्रश्न विचारण्यास आला असता त्यांनी आपण योग्य मुद्द्यावर बोलतो मात्र शिवसेना तसं करत नाही असं मत व्यक्त केलं आहे.विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्त्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचे चित्र पहायला मिळतं.
ट्विटर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मत व्यक्त करतो तेव्हा त्याच्या बाजूने किंवा विरोधात बोलण्याचा हक्क असतो. तसा हक्क मी ही बजावते. अनेकदा मी माझी मत सोशल नेटवर्किंगवरुन मांडत असते. कधी मी ट्रोल होते तर कधी माझं कौतुक होतं. हे पार्ट अॅण्ड पार्सल ऑफ लाइफ आहे,” असं मत अमृता यांनी व्यक्त केलं.
मला जेव्हा काही व्हॅलीड मुद्दे मिळाले की मी ही त्यावर बोलणार. फरक इतकाच आहे की मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.” असं मत अमृता यांनी मांडलं.शिवसेनेला शवसेना म्हणणं असो किंवा आदित्य ठाकरेंबरोबर रंगलेलं ट्विटवॉर असो किंवा प्रियंका चतुर्वेदींसोबत रंगलेलं ट्विटवॉर असो एका मित्र असलेल्या पक्षाबरोबर आता जे बदलेलं नातं आहे त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न अमृता यांना ‘मुंबई तक’च्या विशेष मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.त्यावेळी त्या बोलत होत्या.