मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या येथे दौरा करणार आहेत. 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करणार आहेत. त्यामुळे भाजप अडचणीत आले आहे. त्यामुळे अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी सोबत केंद्रीय कृषीराज्यमंत्री कैलास चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विविध प्रश्न विचारले. त्यावेळी राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी आपणही अयोध्येचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले.
राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे