गुलाम नबी आझाद यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत त्यांच्याविषयी भरभरुन वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांच्यासोबतचे अनुभव व्यक्त करताना त्यांना अश्रु अनावर झाले.
त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं तेंव्हा ते देखील भावुक झाले. या भावनिक निरोपानंतर अशा चर्चा सुरु झाल्या की, गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडून भाजपमध्ये तरी सामील होणार नाहीयेत ना?
गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत मोदी यांच्या भावनिक होण्यामागचे कारण देखील सांगितले. त्यांनी म्हटलं की, कारण हे होतं की 2006 मध्ये एका गुजराती पर्यटकांच्या बसवर काश्मीरमध्ये हल्ला झाला होता आणि मी त्यांच्याशी बोलत असताना रडलो होतो.
शरद पवार यांनी देखील त्यांच्या उत्तुंग कामगिरीबाबत कौतुक केलं.भाजप मध्ये गुलाम नबी आझाद प्रवेश करतील या चर्चांना हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आझाद यांनी म्हटलं की ते त्या दिवशी भाजपमध्ये जातील जेंव्हा काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल.