मी लस घेणार नाही; ‘आमचं सरकार आल्यावर आम्ही मोफत लस देवू, भाजपच्या लसीवर मी कसा विश्वास ठेवू’ : अखिलेश यादव

99

देशातील सर्व राज्यांनी कोरोना लसीकरणासाठी तयार राहावं, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीपुढे बुधवारी सीरमच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशींचे सादरीकरण करण्यात आले. त्यापैकी ‘सीरम इन्स्टिटय़ूट’च्या लशीला शुक्रवारी तज्ज्ञ समितीने मान्यता दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही. आमचं सरकार आल्यावर आम्ही सर्वांना मोफत लस देवू असे आश्वासन देखील यादव यांनी दिले आहे. त्यामुळे आता अखिलेश यादव यांच्या या वक्तव्याचा काय परिणाम होईल ते येणाऱ्या काळात कळेल

एका बाजूला या लसीच्या बाबतीत जय्यत तयारी सुरु असताना आता या लसीच्या बाबतीत राजकारण होऊ लागले आहे. मी कोरोना लसीकरण घेणार नाही. भाजप सरकार कडून देण्यात येत असलेल्या लसीवर मी कसा विश्वास ठेवू ? असा सवाल समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.