आज भाजपचे जेष्ठ नेते, माजी केंद्रिय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली अर्पन करीत, तुम्ही बघितलेलं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य वेचेन असा शब्द यावेळी मुंडेंनी दिला.
आप्पा, ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केलेत. तुमचा लोकसेवेचा वसा आणि वारसा पुढे नेत असतांना तुमच्याच नावाने आपल्या ऊसतोड कामगार बांधवांसाठी महामंडळ सुरु केलं. ऊसतोड कामगार बांधव आणि संपूर्ण समाजासाठी तुम्ही बघितलेलं स्वप्न पुर्णत्वास नेण्यासाठी मी माझं आयुष्य वेचेन” अशा आशयाचे ट्वीट करीत धनंजय मुंडेंनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऊसतोड कामगारांसाठी सामाजीक न्याय या खात्याअंतर्गत धनंजय मुंडे अनेक कल्याणकारी ऊपक्रम राबवत आहे. नुकतेच राज्यातील दहा जिल्ह्यातील ४१ तालुक्यात ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींची ८२ वस्तीगृहे निर्माण करण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात १० तालुक्यात २० वसतीगृहे सुरु करण्यात येणार आहे.
स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कमगार कल्याण मंडळाअंतर्गत ही वस्तीगृहे ऊभारण्यात येणार आहे. संत भगवान बाबा वस्तीगृह योजना असे या योजनेचे नाव असून राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरात मिळाली आहे.