हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर रेमडिसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी स्वतःची 90 लाखांची एफडी मोडल्याने चर्चेत आहेत. त्याच आमदाराची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे.
108 नंबरची अँब्युलन्स वेळेत हजन न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केल्याचं संभाषण या क्लीपमध्ये आहे. संबंधित फोनवरील व्यक्तीला, 20 मिनिटांत गाडी हजर न केल्यास गाडी पेट्रोल टाकून फुकून देईन, असे ते या क्लिपमध्ये म्हटल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषद अध्यक्षांची प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी नेण्यासाठी 108 नंबरला बोलावण्यात आले होते. मात्र, गाडीला दोन तास उशीर झाल्यामुळे आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळाले.
20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर गाडी पेट्रोल टाकून फुकून देईन, असा दम बांगर यांनी संबंधित व्यक्तीला दिल्याचं ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे. सदरील फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.