7/12 जपायचा असेल तर ८/12 महत्त्वाचा आहे, बच्चू कडुंचे जनतेला आवाहन

13

राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध केला आहे. त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामुळे दिल्लीत येणारे सर्व रस्ते हे पंजाब हरियाणा तसेच उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी अडवले आहेत. त्यांच्या मोर्चाला मध्य प्रदेशमधील भाजप सरकारकडून दुसऱ्याच दिवशी बैतुलमध्ये आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. या भारत बंदला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यशस्वी करण्याचे आवाहन केलं आहे.

गेली आठवडाभरापासून हे शेतकरी थंडीचा सामना करत दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागील तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे मोटारसायकल मोर्चा केला आहे. आज मध्यप्रदेशच्या भोपाळ वरून ते रवाना होणार आहेत.

दरम्यान, 7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू यांचा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे शुक्रवार पासून दिल्ली आंदोलनासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन निघाले आहेत. महाराष्ट्रातही प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.